breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतातील स्फोटात सहा ठार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ हे 25 जुलै रोजी होणारी निवडणूक लढवू शकतात असा निकाल पकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आणि न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार नाही, असा दिलासाही दिला आहे. सध्या दुबईत राहणाऱ्या मुशर्रफ यांच्या एपीएमएल (ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग) पक्षाने ही माहिती दिली आहे.

सन 2013 मध्ये उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांना अपात्र ठरवून त्यांच्यावर आजीवन बंदी घातली होती. या निकालविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुशर्रफ यांना दिलासा दिला आहे.
ज. मुशर्रफ हे खैबर पख्तुनवा प्रांतातील चितराल मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्‍यता असल्याचे एपीएमएलचे महासचिव मुहम्मद अमजद यांनी सांगितले आहे. ज. मुशर्रफ निवडणुकीपूर्वी पाकिस्तानात परत येतील असे त्यांनी संगितले असले, तरी त्यांच्या परतण्याची तारीख मात्र सांगितली नाही.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेक नेत्यांनी अपात्र असूनही ज. मुशर्रफ यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button