अन्नधान्य वितरण कार्यालयातील कामचुकार कर्मचा-यावर कारवाई करा

पिंपरी- अन्नधान्य वितरण विभागाच्या निगडी परिमंडळ कार्यालयातील कामचुकार करणा-या कर्मचा-यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ह्युमन राईटस असोसिशएन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन यांनी केली आहे.
अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, निगडी परिमंडळ कार्यालयात अ चिंचवड व ज पिंपरी येथील अधिकारी जागेवर कधीच नसतात. शिधापत्रिकेच्या कामासाठी येणा-या नागरिकांना लिपिक व शिपाई सही करण्यास अधिकारी नसल्याने सांगून अरेरावीची भाषा वापरतात. किरकोळ कामासाठी टोलटोलवीची उत्तरे दिली जातात. चिंचवड व पिंपरी या परिमंडळ कार्यालयात अंधाधुंदी कारभार चालत असून कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी चालत आहे. अशा कामचुकार अधिका-यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, पुणे जिल्हयाचे अध्यक्ष सुभाष कोठारी, पुणे जिल्हा निरीक्षक दिलीप टेकाळे, जिल्हा संघटक मुनीर शेख, पुणे कार्याध्यक्ष विकास कांबळे, पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष अविनाश रानवडे, पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष ओमकार शेरे, पिंपरी-चिंचवड शहराचे सचिव लक्ष्मण दवणे, सचिव पिंपरी-चिंचवड डॉ.सतीश नगरकर, जिल्हा संघटक मुनीर शेख, ग प्रभागाचे सचिव प्रसाद देवळालीकर, ड प्रभागाचे अध्यक्ष जयवंत कुदळे, ड प्रभागाचे उपाध्यक्ष वैभव कादवाने, सचिव भास्कर घोरपडे, काळेवाडी शाखेचे अध्यक्ष सोहनलाल राठोड उपस्थित होते.