अनन्या पांडेची कार झाडाला धडकली

चंकी पांडेची मुलगी अनन्या सध्या “स्टुडंट ऑफ द इयर 2’च्या मसूरीमध्ये होत असलेल्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान तिला एक छोटासा अपघात झाला आहे. शुटिंगदरम्यान एका सीनमध्ये अनन्याला कार चालवत एक ऍक्ट पूर्ण करायचा होता. मात्र कार चालवता चालवता तिचा कारवरचा ताबा सुटला आणि कार वेगाने एका झाडावर जाऊन आदळली. कार चालवताना अनन्याने सेफ्टी बेल्ट बांधलेले होते, त्यामुळे तिला विशेष इजा झाली नाही.
मात्र तिच्या या अपघातामुळे शुटिंगचे वेळापत्रक मात्र कोलमडले. “स्टुडंटस ऑफ द ईयर 2’मधून अनन्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या सिनेमात तिच्याबरोबर टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया हे लीड रोलमध्ये असणार आहेत. आतापर्यंत “स्टुडंट ऑफ….2′ चे बरेचसे शुटिंग वेगवेगळ्या भागांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे.
सिनेमामध्ये वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघेही छोट्या छोट्या भूमिकेमध्ये दिसनार आहेत, असे समजले आहे. मात्र त्यांच्य सहभागाबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. याच सिनेमाच्या पहिल्या भागामधून वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. म्हणून हा दुसरा भाग त्या दोघांसाठी खास आहे.