breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत फ्लेक्सना पालिकेच्या नोटीसा, 13 कोटी दंड जमा होणार

  • स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा

पिंपरी – शहरातील अनधिकृत फ्लेक्सवरून मागच्या स्थायी समिती सभेत टार्गेट झालेल्या आकाशचिन्ह परवाना विभागातील अधिका-यांनी अनधिकृत फ्लेक्सची अकडेवारी जाहीर करून संबंधितांना नोटीसा बजावण्याचे काम हाती घेतले आहे. एकूण 881अनधिकृत फ्लेक्सना अडीचपट नोटीसा बजावण्यात येणार आहेत. याद्वारे 13 कोटींचे उत्पन्न पालिकेला प्राप्त होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड आणि सदस्य विलास मडिगेरी यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत फ्लेक्सची संख्या सर्वाधिक आहे. अशा फ्लेक्सना राजकीय आश्रय मिळत असल्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुढत चालले आहे. त्यावर स्थायी समितीच्या सभापती गायकवाड यांनी तातडीने याबाबत माहिती सादर करण्याच्या सूचना मागील सभेमध्ये केल्या होत्या. त्यावर आकाशचिन्ह परवाना विभागाने सद्यस्थितीत अनधिकृत फ्लेक्सची संख्या बुधवारी (दि. 30) स्थायी समितीच्या बैठकीत जाहीर केली. अनधिकृत फ्लेक्सना नोटीसा बजावण्यात येत असून  आजअखेर 250 अनधिकृत फ्लेक्सना नोटीसा बजावल्या आहेत, असा खुलासा अधिका-यांनी स्थायीच्या बैठकीत केला आहे.

शहरातील अन्य 881 अनधिकृत फ्लेक्सना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. सर्व अनधिकृत फ्लेक्सना दंडात्मक नोटीसा बजावल्या जाणार आहेत. त्यांच्याकडून अडीच पट दंड आकारला जाणार आहे. त्यानुसार 13 कोटी 84 लाख रुपये दंडाची रक्कम पालिकेच्या तिजोरीत पडणार आहे, अशी माहिती मडिगेरी यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button