अधिका-यांच्या बदल्यांमागे गौडबंगाल?, धनंजय मुंडे यांचा सवाल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतक-यांना हवी तशी मदत करता येत नाही. असे, अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिका-यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. नेमका काय गौडबंगाल आहे? असा आक्षेप धनंजय मुंडेंनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही असं अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. हा नेमकी काय गौडबंगाल आहे? pic.twitter.com/eiOK55Ksr1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 11, 2019
मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहितेदरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. जनतेला उत्तर द्या असे म्हणत, बदल्यांवर मुंडेंनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई महागनगरपालिका आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची वर्णी लागली आहे. राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान आता मुख्यमंत्र्याचे विशेष सल्लागार म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे धनजंय मुंडे यांनी सवाल उपस्थित केले आहे.