Mahaenews

अथर्व शिंदे हत्या प्रकरण ; बर्थ डे गर्लसह ११ जण ताब्यात

Share On

मुंबई : गोरेगावमधील आरे कॉलनीतील अर्थव शिंदे (२१) हत्या प्रकरणात पोलिसांनी बारा जणांना ताब्यात घेतले असून यात बर्थ डे गर्लचाही समावेश आहे. अर्थवच्या हत्या प्रकरणात ज्या तरुण-तरुणींची चौकशी सुरु आहे. ते सर्व सधन कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सात मे रोजी बर्थ डे पार्टीसाठी म्हणून घराबाहेर पडलेला अर्थव घरी परतलाच नाही. बेपत्ता असलेल्या अर्थवचा ९ मे रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास आरे कॉलनीतील रॉयल पम्प तळयाजवळ मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा होत्या. अर्थवची हत्या नेमकी कशी झाली त्याचा खुलासा अद्याप पोलिसांनी केलेला नाही. अर्थव बाहेरच्या दिशेने पळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version