breaking-newsमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय
अतिमुसळधार पावसाची शक्यता; ५ राज्यांत पूर परिस्थितीचा इशारा

मुंबई : यंदा मोसमी पावसाचे आगमन जरा जोरात होण्याचा अंदाज आहे. यात केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांमध्ये या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्यांच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून केंद्र सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने या बद्दल सूचना दिली आहे. यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि कोंकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १० जूनपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबद्दल पेयजल मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असेही सांगण्यात आले आहे.