breaking-newsपुणे

अतिक्रमण विभागाला मिळाले 162 निरीक्षक

  • कारवाईला येणार वेग

  • अतिरिक्‍त आयुक्‍त उगले यांचे संकेत

पुणे- शहरात पथ विक्रेता धोरणाची अंमलबजावणी महापालिका सुरू करणार आहे. त्यानंतर महापालिकेने “नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केलेल्या 143 रस्ते आणि 54 चौकांमधील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी सध्या मनुष्यबळच नसल्याने यासाठी खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून सुमारे 162 अतिक्रमण निरीक्षकांच्या नियुक्तीस अतिरिक्‍त आयुक्त शितल उगले यांनी शनिवारी मान्यता दिली. यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे उगले यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागावर संपूर्ण शहराची जबाबदारी असली, तरी या विभागाकडे केवळ 16 निरीक्षक आहेत. त्यांच्यावरच पथारी अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी आहे. मात्र, शहराचा विस्तार आणि लोकसंख्या पाहता ही संख्या अतिशय अल्प आहे. त्यामुळे अतिक्रमणविरोधी विभागासाठी सुमारे 172 अतिक्रमण निरीक्षकांची पदे भरण्यास सेवा नियमावलीत मान्यता देण्यात आली आहे. या जागा भरण्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, काहीच निर्णय न झाल्याने महापालिकेने शासन मान्यता होईपर्यंत खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून अतिक्रमण निरीक्षक भरण्याचा निर्णय घेतला होता. त्याची प्रक्रिया अखेर पूर्ण झालेली असून सोमवारपासून या निरीक्षकांना प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नियुक्त केले जाणार आहे.

महापालिकेकडून केंद्रशासनाच्या पथ विक्रेता धोरणाची अंमलबजवाणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, शहरात सुमारे 21 हजार पथारी व्यावसायिकांना परवाने दिलेले आहेत. त्याचे वाटप अंतिम टप्प्यात असून या धोरणाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मात्र, अतिक्रमण निरीक्षकांची संख्या कमी असल्याने तसेच उपलब्ध निरीक्षकांकडे इतरही जबाबदाऱ्या असल्याने या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन ठेकेदाराकडील अतिक्रमण निरीक्षक भरती करून त्यांच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button