breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अडीच वर्षांत 17 बस जळाल्या

मार्गावरच आग लागल्याने प्रवाशांचा जीव धोक्‍यात 
दुरुस्तीवर प्रश्‍नचिन्ह : ठेकेदारांच्या बसेस “हिटलिस्ट’वर

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बसेसला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, दि.20 एप्रिल 2016 ते 30 ऑक्‍टोबर 2018दरम्यान चालू मार्गावर तब्बल 17 बसेसने पेट घेतल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. यात पीएमपीच्या मालकीच्या आणि ठेकेदारांच्या बसेसचा समावेश आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळातील ताफ्यात मालकीच्या 1,440 तर ठेकेदारांच्या 653 बसेस आहेत. यात जुन्या बसेसची संख्या लक्षणीय आहे. महिनाभरापूर्वी कोथरुड डेपोत उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतला. ही बस ठेकेदारांकडून चालवण्यात येत होती. एकूणच पेटलेल्या 17 बसेसपैकी ठेकेदारांच्या बसेसचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच, जुन्या बसेसची वेळेवर देखभाल दुरुस्ती होणेही गरजेचे आहे. तशा सूचना डेपो प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अचानक बसेस पेट घेत असल्याने देखभाल दुरुस्तीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. आग लागणे, मेन्टेनन्सअभावी बसेसचा अपघात होणे यामध्ये ठेकेदारांकडून चालवण्यात येणाऱ्या बसेसचे प्रमाण जास्त आहे. यामुळे ठेकेदारांवर वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्‍त केली जात आहे.

ठेकेदारांबाबत समन्वयाचा अभाव

पीएमपीच्या ताफ्यात ठेकेदारांकडून 653 बसेस चालवण्यात येतात. अनेकदा पीएमपी बसचा अपघात झाल्यास, नादुरुस्त बसेस पीएमपी प्रशासनाच दुरुस्त करते. मात्र, ठेकेदारांच्या बसेची देखभाल दुरुस्ती ठेकेदारांकडून स्वतः केली जाते. तसेच या बसेसवरील चालकही ठेकेदारांकडून नेमलेले असल्याने अनेक घटना घडतात. तसेच, त्यांची देखभाल दुुरुस्ती वेळोवेळी झाली आहे किंवा नाही याबाबत पीएमपी प्रशासन आणि ठेकेदारांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button