breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अंगणवाडी सेविका जाणार संपावर; आमदार लांडगे यांना साकडे!

– प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी

पिंपरी- अंगणवाडी कर्मचारी महिलांचे तुटपुंजे वेतन, ठरलेल्या कामापेक्षा जास्त कामकाज तसेच अंशकालीन नेमणूक, किमान वेतन व विविध सुविधांचा सुरक्षा लाभ दिला जात नसल्याकारणाने अंगणवाडी कर्मचारी महिला बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदन आमदार महेश लांडगे यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती कर्मचारी संगठना पुणे जिल्हा समितीच्या वतीने देण्यात आले आहे.  मुंबईतील आझाद मैदानावर दि. 12 रोजी व दि. 18 रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. महिला अंगणवाडी सेविकांनी विविध समस्यांच्या मागण्यासाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘एकात्मिक बालविकास महिला योजनेअंतर्गत महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका काम करतात. अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच हजार रूपये व मदतनिसांना दरमहा 2500 रूपये वेतन दिले जाते. शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत अंगणवाडी सेविकांची नेमणूक असून देखील त्यांना स्वयंसेविकांचाच दर्जा दिला जात आहे. अंगणवाडीसेविका पाच तास काम करून देखील जिल्हा परिषद इतर कामांसाठी सेविकांना राबवून घेते. तसेच निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, “अंगणवाडी सेविकांसाठी महाराष्ट्र राज्य महिला बालविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व नियोजन विभाग उच्च अधिकारी व कृती समितीच्या अध्यक्षतेखाली मानधनवाढ समिती नियुक्त करण्यात आली होती. मानधनात दुपटीने वाढ करण्याची शिफारस दि. 9 मार्च 2017 झाली आहे.

———

पोषक आहारातील रकमेत वाढीची मागणी…

एकात्मिक बालविकास अंतर्गत सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना ‘टीएचआर’ दिला जातो. अदिवासी भागातील बालमृत्यू व कुपोषणाचे प्रमाण टाळण्यासाठी बालकांना हा टीएचआर असतो. मात्र बालकांचे टीएचआर खाण्याचे प्रमाण पाच टक्के आहे. यासाठी पर्यायी आहार देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी यापूर्वी केली होती, त्याऐवजी पाकीटबंद आहार बालकांना देण्यात यावा. तसेच प्रत्येक बालकाच्या मागे देण्यात येणाऱ्या 4.92 पैसे रुपयाचा पोषक आहारातील रकमेत तिपटीने वाढ करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेना जून 2017 पासून प्रलंबित मानधन मिळालेले नाही. अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका निदर्शन करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button