breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Nanded Loksabha 2019 : शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांना भाजपची उमेदवारी

नांदेड –  लोकसभा निवडणुकीची भाजपची राज्यातील दुसरी यादी जाहीर झाली. नांदेडमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चिखलीकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा तात्काळ राजीनामा दिला आहे.

शिवसेनेचे प्रताप पाटील हे लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली होती. भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. सोमवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. प्रताप पाटील सेनेचे आमदार असताना दोन वर्षांपासून भाजपात दाखल झाले होते.

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत चिखलीकरांनी पक्षाचा आदेश डावलून भाजपला मदत केली होती. तसंच मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकींमध्येही चिखलीकर कायम हजर राहत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही नांदेड पालिकेत कामगिरीनंतर चिखलीकरांचं जाहीर कौतुक केलं होतं. अखेर भाजपकडून चिखलीकरांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. चिखलीकर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना आव्हान देणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button