breaking-newsराष्ट्रिय

#MeToo : महिला पत्रकारही काही साध्या भोळ्या नाहीत: भाजपा नेत्या लता केळकर

केंद्रीय विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्याने मोदी सरकारवर टीका होत असतानाच मध्य प्रदेशमधील भाजपा नेत्या लता केळकर या अकबर यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला या पत्रकार आहेत. महिला पत्रकारही काही साध्या भोळ्या नाही. चूक त्यांचीदेखील आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

पत्रकार आणि केंद्रीय विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अकबर हे पत्रकारिता क्षेत्रात असताना त्यांनी लैंगिक छळ आणि असभ्य वर्तन केल्याचा आरोप काही महिलांनी केला आहे. अकबर यांच्यावरील आरोपांवर मोदी सरकारने मौन बाळगले असून अकबर हे सध्या परदेशात आहेत. परदेश दौऱ्यावरुन आल्यावर ते या आरोपांवर स्पष्टीकरण देतील, असे समजते. दुसरीकडे अकबर हे परदेश दौऱ्यावरुन परतल्यावर मोदी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले, अशी देखील चर्चा आहे.

ANI

@ANI

: I welcome this campaign but I don’t consider women journalists to be so innocent that anyone can misuse them, says Lata Kelkar, Chief of Madhya Pradesh BJP women wing on MJ Akbar. (11.10.18)

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या मध्य प्रदेशमधील नेत्या लता केळकर यांना अकबर यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर केळकर म्हणाल्या. एम. जे. अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या महिला या पत्रकार आहेत. महिला पत्रकार इतक्याही साध्या भोळ्या नसतात की कोणी त्यांचा गैरफायदा घेईल. यानंतर केळकर यांनी ‘मी टू’ मोहीमेचे स्वागतही केले. महिलांनी लैंगिक छळ आणि अत्याचारांच्या प्रकारांना वाचा फोडलीच पाहिजे. महिलांनी हिंमत केलीच पाहिजे. लता केळकर या भाजपाच्या मध्यप्रदेशमधील महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button