breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#MeToo ची भिती दाखवून युवतीने पुरुषाला लुटले

पुणे  : मी टू मुळे अगोदरच पुरुष मंडळी धास्तावलेली असतानाच अनेकांनी अजुनही माणूसकी सोडलेली नाही. स्त्री दाक्षिण्य म्हणून अडचणीतील स्त्रियांना मदत करण्याचा स्वभाव अनेकांचा असतो. पण हाच स्वभाव कधी कधी महागात पडू शकतो याचा अनुभव पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण पेठेत राहणारी एक ५३ वर्षीय व्यक्ती बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास दुचाकीवरून जात होती. साधू वासवानी चौकाजवळ विजय सेल्स येथे आले असता तिथे उभ्या असलेल्या एका तरुणीने त्यांना लिफ्ट मागितली. रात्रीची वेळ असल्याने एकट्या उभ्या तरुणीला त्यांनी लिफ्ट दिली. पण काही अंतर पुढे गेल्यानंतर तिने ‘तुम्ही माझा विनयभंग केला’ असा आरोप त्या व्यक्तीवर केला व आरडओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच हे प्रकरण इथेच मिटवायचे असेल, तर मला पैसे द्या अशी मागणी तिने केली. या व्यक्तीकडे घराचा इएमआय भरण्यासाठी काढून ठेवलेली १४ हजाराची रोख रक्कम होती. ही रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन ती तरुणी निघून गेली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस अधिक तपास करीत आहेत. याबाबत नारायण पेठेत राहणा-या ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार निळी जिन्स आणि गुलाबी टॉप घातलेल्या (वय २७) तरुणीच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button