breaking-newsराष्ट्रिय

#MeToo काँग्रेसच्या दारात, UPA मधील मंत्र्यावर चुंबन घेतल्याचा आरोप

#MeToo मोहिमेतंर्गत आता आणखी एका काँग्रेस नेत्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवारीच काँग्रेसने लैंगिक छळाचा आरोप झाल्याने एनएसयूआच्या अध्यक्षाचा राजीनामा घेतला होता. एका महिला पत्रकाराने काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील मंत्र्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

सोनल केलॉग या महिला पत्रकाराने संपुआ -१ मधील त्या मंत्र्याचे नाव जाहीर केलेले नाही. पण महिला पत्रकारांना काम करताना कुठल्या परिस्थितीतून जावे लागते ते सांगितले आहे. एशियन एजच्या मालकाने गुजरातमधील आवृत्ती बंद केल्यानंतर सोनल केलॉग यांना २००६ साली दिल्लीला जावे लागले. त्यावेळी केलॉग यांच्याकडे एका केंद्रीय मंत्रालयातील बातम्या कव्हर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या नेत्याकडे मंत्रिपद होते. प्रसारमाध्यमांमध्ये लोकप्रिय असलेला या नेत्याचे शिक्षण दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये झाले होते.

हा नेता नेहमी माझ्या शरीराला स्पर्श करायचा. चुंबन घेऊन स्वागत करायचा असे केलॉग यांनी लिहिले आहे. तो नेहमी चुंबन घेऊन माझे स्वागत करायचा. मला वाटायचे कि, ही दिल्लीमधली पद्धत असावी. मी गुजरातमधून आली होती. तिथे अशी पद्धत नव्हती. गुजरातमध्ये मिठी मारणे किंवा चुंबन घेणे असे प्रकार नव्हते.

अनेकवेळा हा नेता माझा चेहरा पकडून माझ्या ओठांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करायचा असे केलॉग यांनी लिहिले आहे. २०१४ साली मी या मंत्र्याला त्याच्या दिल्लीतील बंगल्यामध्ये भेटायला गेली होती. माझ्याशी बोलत असताना हा नेता वॉशरुमला जाण्यासाठी म्हणून उठला त्यावेळी त्याने माझ्याबरोबर अत्यंत अश्लील वर्तन केले. या प्रकरानंतर मी त्या नेत्याला मला स्पर्श करु असे बजावले. त्यावर त्याने का नको ? असा प्रतिप्रश्न आपल्याला केल्याचे केलॉग यांनी डेलीओमध्ये लिहिले आहे.

लैंगिक छळाचा आरोप झाल्याने काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया)चे अध्यक्ष फिरोज खान यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याचा राजीनामा मंगळवारी स्विकारला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button