breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Maval Loksabha : शिवसेना खासदार बारणेंच्या टिकेला पार्थ पवारांनी दिलं चोख प्रत्युत्तर

  • माझ्यावर टिका करून बारणेंना खूपच आनंद मिळतोय!
  • मी तर कामातून बोलणारा राष्ट्रवादीचा साधा कार्यकर्ता

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून कोण पार्थ पवार, असे कित्येक पवार आले तरी फरक पडत नाही, अशी टिका केली होती. त्याला मावळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. “माझ्यावर टिका करून बारणेंना आनंद मिळत असेल, तर त्यांनी खुशाल टिका करावी. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांच्या वयाचा मान राखून टिका न करता मी कामातून बोलणारा व्यक्ती आहे”, असे म्हणून पार्थ पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आहे.

मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीतर्फे पार्थ पवार यांचे फ्लेक्स झळकत होते. त्यावरून खासदार श्रीरंग बारणे यांना महिनाभरापूर्वी पत्रकार परिषदेत याबाबत विचारले होते. त्यावर बारणे यांनी कोण पार्थ पवार?, मी कोण्या पार्थ पवाराला ओळखत नाही. असे कित्येक पवार आले तरी मला फरक पडत नाही. मतदार संघात केलेले काम हीच माझी ओळख आहे. त्यामुळे नागरिकांना माझी वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. असे बारणे म्हणाले होते. बारणे यांच्या टिकेला पवार कुटुंबियांतून प्रत्युत्तर येणे अपेक्षीत होते. मात्र, आज वाढदिवसाच्या निमित्ताने युवा वर्गाच्या शुभेच्छा घेण्यासाठी शहरात आलेले पार्थ पवार यांनी बारणे यांच्या टिकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

पार्थ पवार म्हणाले की, खासदार बारणे हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांच्यावर मी टिका करणे योग्य नाही. माझ्यावर टिका करून त्यांना आनंद मिळत असेल, तर त्यांनी खुशाल टिका करावी. मी कमी बोलून उत्तम काम करण्यावर भर देणारा कार्यकर्ता आहे. बोलून टिका टिपण्णी करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रीत केल्यास काम अधिक दर्जेदार होते. त्यातून आपली वेगळी ओळख तयार होते, असेही ते म्हणाले.

….या नेत्यांनी दाखविले राजकीय रंग

राज्यपातळीवरील राजकारण पाहता पक्षाला फटका बसतोय. पक्षतील दिग्गज मानले जाणारे नेते रणजीतसिंह मोहिते पाटील, सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. यावर विचारले असता पार्थ पवार म्हणाले की, निवडणुका आल्या की पक्षात आदलाबदल सुरूच असते. त्याचा पक्षावर कसलाही परिणाम पडणार नाही. ते जसे पक्ष सोडून जात आहेत. तसेच, आम्ही पण इतर पक्षातले नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीत समावून घेत असतो. त्यामुळे हे चडउतार राजकीय पक्षांना असतातच. यात नवीन असे काही नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button