breaking-newsमनोरंजन

Love Sonia review : विचार करण्यास भाग पाडणारा ‘लव्ह सोनिया’

हिंदी कलाविश्वात आजवर बरेच विषय मोठ्या शिताफीने हाताळण्यात आले आहेत. चित्रपटांच्या माध्यमातून अशाच विषयांवर प्रकाशझोततही टाकण्यात आला आहे. ज्या यादीत सध्याच्या घडीला चर्चेत असणारा चित्रपट आहे ‘लव्ह सोनिया’.

दोन बहिणींच्या नात्याचा आधार घेत मानवी तस्करीच्या जगाचं कटू सत्य या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक तरबेज नूरानी यांनी केला आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर प्रकाशझोत टाकत या चित्रपटाच्या कथानकाची सुरुवात होते. कर्जबाजारीपणा दूर करण्यासाठी म्हणून तो आपल्या मुलीचीच किंमत लावून तिची विक्री करतो. त्याचवेळी सोनियाला जेव्हा ही हकिगत कळते तेव्हा ती आपल्या बहिणीला शोधण्यासाठी म्हणून देहविक्रीच्या अंधाऱ्या जगात पाऊल ठेवते. ज्यानंतर ती या जगात असलेल्या गुंतागुंतीच्या जाळ्यात गुरफटत जाते. चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांवर प्रभाव पाडत असलं तरीही त्यात काही गोष्टींची उणिव जाणवते. पण, कलाकारांचा अभिनय या गोष्टींची उणिव भरुन काढण्यात यशस्वी ठरतं हेसुद्धा तितकच खरं.

कथानकाला रंजक वळण तेव्हा येतं, ज्यावेळी सोनियाला तिची बहीण सापडते. आता सोनियाला तिची बहीण सापडल्यावर पुढे तिचा प्रवास नेमका कसा असणार हे तर तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हाच कळेल.

 

देहविक्रीच्या जगात नेमकं चित्र कसं असतं ते रेखाटण्याचा प्रयत्न यापूर्वी ‘मंडी’, ‘बाजार’, ‘मौसम’, ‘लक्ष्मी’, ‘बेगम जान’ यांसारख्या चित्रपटांतून करण्यात आला आहे. पण, त्यातही तरबेज नूरानी दिग्दर्शित ‘लव्ह सोनिया’ हा आपलं वेगळंपण सिद्ध करत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच दिग्दर्शकाने नेमकं कथानकावर किती काम केलं आहे आणि कथेचा कितपत अभ्यास केला आहे, हेसुद्धा प्रभावीपणे स्पष्ट होतं. माणूसकीच्या मुखवट्याआड दडलेल्या असूरी प्रवृतीलाही खुलासा ‘लव्ह सोनिया’तून करण्यात आला आहे.

चित्रपटातील काह दृश्य कथानकाच्या दृष्टीने अशी काही प्रत्ययकारीपणे साकारण्यात आली आहेत की त्यामुळे प्रेक्षक म्हणूनही विदारक परिस्थितीविषयी विचार करण्यास आपण भाग पडतो. सई ताम्हणकर, राजकुमार राव, अनुपम खेर, आदिल हुसैन, मृणाल ठाकूर, रिचा चड्ढा या कलाकारांनी आपल्या वाट्याला आलेल्या पात्रांना न्याय देत ‘लव्ह सोनिया’ तितक्याच प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वास्तवदर्शी आणि तितक्याच विचार करण्यास भाग पाडणाऱ्या चित्रपटांच्या शोधात असाल तर ‘लव्ह सोनिया’ एकदा पाहाच.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button