breaking-newsआंतरराष्टीय

IPL 2019 : भुवनेश्वर कुमारकडे संघाच्या उप-कर्णधारपदाची धुरा

नवी दिल्ली – 2018 सालात भारतीय संघाकडून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भुवनेश्वर कुमारला यंदाच्या आयपीएल हंगामात बढती मिळाली आहे. सनराईजर्स हैदराबाद संघाच्या उप-कर्णधारपदाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार संघाचं नेतृत्व करणार आहे.

सनराईजर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व हे ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरकडे होतं. मात्र बॉल टॅम्परिंग प्रकरणात घालण्यात आलेल्या बंदीच्या शिक्षेनंतर मागच्या हंगामात केन विल्यमसनने संघाचं नेतृत्व केलं. मात्र यंदा वॉर्नरने यंदाच्या हंगामात संघामध्ये पुनरागमन केलं आहे. त्यामुळे आपल्या खांद्यावरची नवीन जबाबदारी भुवनेश्वर कुमार कशी पार पाडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button