breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भोसरी पोलिसांची कारवाई ; सात चोरट्यांकडून 22 टू-व्हिलर हस्तगत

पिंपरी –  भोसरी पोलिसांनी ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दुचाकी चोरी करणा-या सात चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 22 टू-व्हिलर पोलिसांनी हस्तगत करुन मोठी कारवाई केली आहे.

संतोष श्रीमंत लांडे (वय 19), अमोल रमेश गिरी (वय 19), योगेश बाळकृष्ण शेंडगे (वय 18, तिघे रा. सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे), गणेश सुनील बोरकर (वय 24, रा. साईल पार्क इमारत, आळंदीरोड, भोसरी), विवेक सुभाष साबळे (वय 26), अतुल मारुती बोरकर (वय 23), शंकर लक्ष्मण काळे (वय 31, तिघे रा. सायगाव, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांनी वेगवेगळ्या दोन कारवायांमध्ये मिळून या सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून 11 स्प्लेंडर, 2 पॅशन, 2 सीडी डीलक्स, 1 पल्सर, 4 होंडा शाईन आणि 2 युनिकॉर्न अशा एकूण 22 टू व्हीलर हस्तगत करण्यात आल्या. त्यांची एकूण किंमत सहा लाख 80 हजार रुपये आहे. त्यापैकी शंकर काळे यांच्याकडून पाच लाख 10 हजार रुपये किमतीच्या 17 टू व्हीलर जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, पोलीस उपनिरीक्षक गिरीष चामले, सहायक पोलीस फौजदार रघुनाथ तापकीर, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण, संदिप गवारी, विपुल जाधव, दीपक साबळे, किरण जाधव, नितीन खेसे, विजय तेलेवार यांनी ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button