breaking-newsपुणेमहाराष्ट्र

5 रुपयांचा वाद बेतला 5 हजार रुपयांवर

  • सुट्ट्या पैशांवरुन वादावादी : पीएमपी वाहकाला प्रशासनाचा “डोस’
  • चालकानेच केली होती वाहकाविरुद्ध तक्रार

पुणे – चिल्लर पैशांसाठी पीएमपी प्रवाशाशी वाद घालणे एका वाहकाला चांगलेच महागात पडले आहे. हे प्रकरण एप्रिलमधील असून यात पीएमपी प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या प्रकरणाने आतातरी पीएमपीचे वाहक प्रवाशांशी सौजन्याने वागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पीएमपीने प्रवासादरम्यान अनेकदा वाहक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा वादावादी होते. सुट्टे पैसे, दरवाजात उभे राहणे, गर्दी असताना पुढे न सरकणे अशी कारणे असल्याचे अनेकदा दिसून येते. यातील काही सामजस्यांने सोडवले जातात, तर काही वाद पोलिसांपर्यंत पोहचतात. अशीच घटना पीएमपीच्या हडपसर डेपोमधील बसमध्ये घडली. वाहकाजवळ सुट्टे पैसे नसल्याने प्रवाशांना पैसे देणे शक्‍य झाले नाही. दरम्यान दोन-चार प्रवाशांसोबत असाच प्रकार घडल्याने वाहक आणि प्रवासी यांच्यात वाद झाला. ही वादावादी चालकाच्या कानावर गेल्याने चालकानेच संबंधित वाहकाविरोधात डेपो व्यवस्थापकाकडे तक्रार केली. त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन संबंधित प्रकरण चौकशीसाठी पीएमपी प्रशासनाकडे हस्तांतरित केले. चौकशी समितीने संबंधित चालकाचा जबाब घेऊन तपास केला. त्याचबरोबर पुराव्याची पाहणी केली. यानंतर अहवाल तयार करुन वाहकाला दोषी ठरवून पाच हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे. यामुळे प्रवाशांसोबत सुट्ट्या पैशांचा वाद वाहकाला पाच हजाराला पडल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
—————————————–

– प्रवाशांनो, तक्रार करा : प्रशासन
ुसंबंधित घटना ही एप्रिल 2018 मध्ये घडली. याबाबत सविस्तर चौकशी करुन अहवाल तयार करण्यात आला आहे. वाहक दोषी आढळल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी प्रत्येक वाहक-चालकाने सौजन्यपूर्वक वागले पाहिजे. गैरप्रकार घडल्यास नागरिकांनी तक्रार करावी. त्याची दखल घेऊन दोषींविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button