breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

5 लाख 85 हजार रुपये किंमतीचे महागडे मोबाईल पोलिसांच्या हाती

  • युनिट एकच्या पथकाने केली कारवाई
  • अल्पवयीन मुलासह तरुणाला घेतले ताब्यात

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मोबाईल चोरट्यांचा डाव मोडीत काढत तब्बल 5 लाख 85 हजार रुपयांचे महागडे 67 मोबाईल हस्तगत केले आहेत. या कारवाईत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून तोही यात सामील असल्याचे समोर आले आहे.

अमिन सज्जाद इनामदार (वय 25, रा. आदर्शनगर, मोशी), शेखर संभाजी जाधव (वय 19, रा. दिघी रोड, भोसरी, मूळ रा. मुपो मोगा, ता. उदगीर, जि. लातूर) असे अटक केलेल्या मोबाईल चोरांची नावे आहेत.

दोन सराईत गुन्हेगार मोबाईल फोनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई गणेश सावंत यांना मिळाली. त्यानुसार युनिट एकच्या पथकाने आरोपी अमिन इनामदार याला नाशिक फाटा परिसरातून तर शेखर जाधव याला भोसरी ओव्हर ब्रीज परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी मोबाईल फोन चोरल्याचे सांगितले. अमिन याच्याकडून 13 तर शेखर याच्याकडून 41 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपी मोबाईल चोरी करणारे सराईत आरोपी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता भोसरी परिसरात राहणा-या एका अल्पवयीन मुलाकडे देखील मोबाईल फोन असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्याकडून 13 मोबाईल फोन जप्त केले. तिघांकडून एकूण 5 लाख 85 हजार रुपये किमतीचे 67 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये भोसरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातून मोबाईल चोरी गेलेल्या नागरिकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील (9702999467) यांच्याशी संपर्क करावा. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी रविंद्र राठोड, राजेंद्र शेटे, दिपक खरात, प्रमोद लांडे, प्रमोद वेताळ, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, सावन राठोड, सचिन उगले, प्रविण पाटील, प्रमोद हिरळकर, सुनिल चौधरी, विशाल भोईर, गणेश मालुसरे, तानाजी पारसरे, अरुण गर्जे, सचिन मोरे, गणेश सावंत यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button