breaking-newsक्रिडा

33 व्या पुणे मॅरेथॉन स्पर्धेत दिली जाणार 30 लाखांची पारितोषिके

पुणे- येत्या रविवारी (2 डिसेंबर) आयोजीत केलेल्या 33व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये एकूण तीस लाखांची पारितोषिके दिली जाणार असल्याची घोषणा आयोजन समीतीकडून करण्यात आली असून यंदाच्या मॅरेथॉन शर्यतीला भारताच्या पोलट्री उद्योगाचे जनक पद्मश्री डॉ. बी.व्हि.रावयांच्या नावाने होणार आहे.

नेहमी प्रमाणे मॅरेथॉन सारस बागेजवळील सणस क्रीडांगणापासून रविवारी प्रारंभ होणार असून यंदा हि मॅरेथॉन नेहमी पेक्षा लवकर म्हणजेच पहाटे पावणेपाचच्या सुमारास सुरूवात केली जाणार आहे. यामध्ये मॅरेथॉन (42.195 किमी), अर्धमॅरेथॉन (21 किमी), 5 आणि 10 किलोमीटर शर्यत, व्हिलचेअर शर्यत, प्रल्हाद सावंत चॅरिटी रन; तसेच 14 आणि 16 वर्षांखालील मुलां-मुलींच्या शर्यती होणार आहेत.

यंदाच्या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला पोल्ट्री उद्योगातील आघाडीच्या वेंकटेश्वरा हॅचरीज ग्रुपचे संस्थापक पद्मश्री बी. व्ही. राव यांचे नाव देण्यात आले असून, रविवारी विविध शर्यतींत 15 हजार धावपटू आपले कौशल्य यावेळी पणाला लावतील. या वेळी, 30 लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. आणखीन एक वैशिष्ट्‌य म्हणजे या मॅरेथॉनचे “यू-ट्यूब’वर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे,’ अशी माहिती पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे ट्रस्टी अभय छाजेड यांनी दिली आहे. या वेळी रेस डायरेक्‍टर सुमंत वाईकर, जॉइंट रेस डायरेक्‍टर रोहन मोरे, बाप्टिस्ट डिसूझा आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button