breaking-newsपिंपरी / चिंचवड

311 दिव्यांगाना मिळणार कृत्रिम अवयवांसह विविध साधने

पिंपरी- केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकार मंत्रालयाच्या सहयोगाने व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 311 दिव्यांगांना शुक्रवारी (दि.25) आकुर्डीत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी येणा-या साडेचार लाख रुपये खर्चाला बुधवारी (दि.16) झालेल्या स्थायी समितीत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. 

आकुर्डी येथील साई उद्यानात 25 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी चार या वेळेत हा साहित्य वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड शहरातील 311 दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी खासदार अमर साबळे, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकार मंत्रालयाच्या सहयोगाने दिव्यांगांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे. कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीने मुद्रा लोनबाबत माहिती व अर्ज वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निजोयनासाठी, उपस्थित सर्वांना भोजन देणे यासह इतर अनुषांगिक खर्च यासाठी साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button