breaking-newsपुणेमहाराष्ट्र

21 लाख 50 हजाराची फसवणूक

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची 21 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आणखी सात ते आठ जणांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी नोदवल्या आहेत. फिर्यादी जितेंद्र पाठक (45, रा.ऍमेनोरा पार्क, हडपसर) यांना आरोपींनी रुद्र फायनान्सीयल सर्व्हिस ऍण्ड रिसर्च कंपनीमार्फत ओसवाल ऍसेट मॅनेजमेंट व ओसवाल सिक्‍युरिटी लिमीटेड नावाच्या कंपनीत व्यवसायिक भागीदार असल्याचे आरोपींनी सांगितले होते. यानंतर त्यांना रिअल इस्टेट व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्‍वास संपादन करुन त्यांच्याकडून तब्बल 21 लाख 50 हजार रुपये गुंतवणुकीसाठी घेतले गेले. ही रक्‍कम 2017 ते 22 जून 2018 दरम्यान घेतली गेली. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा तसेच मूळ रक्‍कम परत करण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पुणे हे तपास करत आहेत. यातील फिर्यादी हे आयटी कंपनीमध्ये कामाला आहे, यातील एक आरोपी त्यांच्या शेजारच्या इमारतीमध्ये रहायला आला होता. त्याच्याशी ओळख झाल्यावर त्याने माझा शेअर मार्केटींगचा व्यवसाय आहे, गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगितले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेऊन फिर्यादीने पैसे गुंतवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button