breaking-newsमनोरंजन

20 वर्षांनी स्टेज परफॉर्मन्स करणार रेखा

थायलंडची राजधानी बॅंकॉकमध्ये शुक्रवारी “इंटरनॅशन इंडियन फिल्म ऍकेडमी ऍवॉर्ड’ चा रंगतदार समारंभ होणार आहे. या समारंभामध्ये तब्बल 20 वर्षांनी अभिनेत्री रेखा लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स करणार आहे. “आयफा’चा रंगारमग सोहळ्यासाठी आयोजकांनी 2000 सीटचे सियाम निरमित थिएटर बुक केले आहे.

या कार्यक्रमात रणबीर कपूर, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, कृती सेनॉन, बॉबी देओल आणि नुसरत भरुचा सारख्या कलाकारांचे परफॉर्मन्स होणार आहेत. मात्र या सर्वांपेक्षा रेखाचा परफॉर्मन्स हे या समारंभाचे मुख्य आकर्षण असणार आहे. रितेश देशमुख आणि करण जोहर हे या समारंभाचे सूत्रसंचालन करणार आहेत. “आयफा’च्या गेल्या 17 वर्षांच्या इतिहासात जगभरातील प्रतिष्ठित शहरांमध्ये या समारंभाचे आयोजन झाल्याचा इतिहास आहे.

यापूर्वी जोहान्सबर्ग, ऍम्स्टरडॅम, दुबई, कोलंबो, टोरांटो, टांपा बे, कुआलालांपूर आणि न्यूयॉर्कमध्ये “आयफा’चे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या “आयफा’मध्ये महिला सशक्तीकरण, लैंगिक समानता आणि प्लॅस्टिक प्रदूषणाला विरोध या तीन विषयांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. रेखाच्या परफॉर्मन्सबाबत मात्र कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. रेखाची खासियत असलेला “उमराव जान’मधील मुजरा ती सादर करेल अशी अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button