breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पर्यावरण संतुलनसाठी कायदे-नियमांची माहिती आवश्‍यक

  • महापौर मुक्‍ता टिळक : घनकचरा व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा

पुणे – पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि त्यासाठी प्रदूषण करणाऱ्या घटकांना विरोध करून अस्तित्वात असलेल्या कायदे-नियमांद्वारे अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. यासाठी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांना कायदे नियमांची माहिती असणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी गुरूवारी केले.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचे नियम या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये त्या बोलत होत्या. घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांच्या अनुषंगाने सर्व कायदे-नियमांच्या विषयांवरील माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक आणि अन्य अधिकारी तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था यांना या कायदे-नियमांची सविस्तर माहिती कार्यशाळेद्वारे मिळणार असून संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून ही माहिती मिळणार आहे.
महापालिकेला सजग राहून काम करावे लागते, त्यामुळे प्लॅस्टिक बंदी, कचरा वर्गीकरण, बायोमेडिकल वेस्ट, घातक पदार्थ निर्मूलन व्यवस्थापन, राडारोडा विल्हेवाट अशा विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना कायदे-नियमांची माहिती अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळे आयोजित कार्यशाळेचा सर्वांना फायदा होणार असल्याचे महापौर म्हणाल्या.

कार्यशाळेमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, मुंबई संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्नेहा पळणीटकर यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम या विषयावर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हार्यनमेंट मॅनेजमेंट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्‍टर देवयानी सावंत यांनी प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल या विषयावर यशदा येथील डायरेक्‍टर डॉ. सुनिल धापटे यांनी कन्स्ट्रक्‍शन ऍन्ड डिमोलिशन वेस्ट मॅनेजमेंट रुल या विषयावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हार्यनमेंट मॅनेजमेंटचे प्राध्यापक डॉ. श्रीनिवास चिलूकुरी यांनी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रुल या विषयावर, एसीसी लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उल्हास परळीकर यांनी घातक पदार्थ विषय रुल्स या विषयावर त्यांनी व्याख्याने दिली.

याप्रसंगी सिटीझन फोरम, नॅशनल सोसायटी फॉर क्‍लिन सिटीज, मॉडेल कॉलनी सुधार समिती, जनवाणी स्वच्छ अशा विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे प्रतिनिधी शशिकांत लोखंडे नॅशनल प्रॉडक्‍टव्हिटी कौन्सिलचे प्रादेशिक संचालक बी. पी. भंडारे तसेच उपायुक्‍त माधव देशपांडे, उमेश माळी आणि महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर, अरुण खिलारी, संदीप कदम, अविनाश सकपाळ आणि विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सहमहापालिका आयुक्त सुरेश जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच प्रास्ताविकपर भाषणात कार्यशाळेबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. केतकी घाडगे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button