breaking-newsआंतरराष्टीय

२७२ उपग्रह संपूर्ण जगाला देणार ‘फ्री वायफाय’

चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क लवकरच संपूर्ण जगाला मोफत वायफाय सेवा देण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते, त्यांचे पहिले उपग्रह पुढीलवर्षी चीनमधील गासू प्रांतातील जिऊकुआं उपग्रह स्थानकावरुन ते लाँच केले जाईल आणि २०२० पर्यंत अंतराळात असे १० उपग्रह पाठवण्याचे नियोजन केले आहे. २०२६ पर्यंत अंतराळात लिंकश्योरचे असे २७२ उपग्रह कार्यरत राहतील. त्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मोफत वायफाय नेटवर्क उपलब्ध होईल.

कंपनीचे सीईओ वाँग जिंगयिंग यांनी याबाबत माहिती दिली. ही योजना यशस्वी करण्यासाठी कंपनी ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर भविष्यात यातून मोठी कमाई होऊ शकेल. चीनमधील एका वृत्तपत्राच्या मते, अंतराळातून येणाऱ्या वायफाय नेटवर्कला लोकांना आपले स्मार्टफोन्स सहजपणे कनेक्ट करता येतील. इतकेच नव्हे जिथे टेलिकॉम नेटवर्कही पोहोचत नाही तिथेही याचे नेटवर्क जाईल.

एका अहवालानुसार, जगातील ३०० कोटीहून अधिक लोक अजूनही इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. याचवर्षी स्पेसएक्सला अंतराळात ७ हजार स्टारलिंक उपग्रह पाठवण्यास परवानगी मिळाली आहे. येणाऱ्या काळात स्पेसएक्स अंतराळातून पृथ्वीवर इंटरनेट सेवा पाठवणारे १६०० उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. स्पेसएक्स शिवाय गुगल, वनवेब आणि टेलिसॅटसारख्या कंपन्याही अशाच पद्धतीची योजना अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या कंपन्यांचे उपग्रह आणि बलून्सही अंतराळातून संपूर्ण पृथ्वीवर हायस्पीड वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे काम करतील.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button