breaking-newsमहाराष्ट्र

२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका

२०१८ च्या अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. २०१९ सुरू होण्यास फक्त १५ दिवस बाकी आहेत. अनेक जणांना २०१९चे वेधही लागले असतील. नववर्षात फिरायला जाण्याचं किंवा लग्नाकार्याचं प्लानिंग करायचं असेल, तर सुट्ट्या पाहणं मस्टच! यंदाच्या वर्षात रविवारी आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे रजेच्या नियोजनाला कात्री लागली असली, तरी २०१९ मध्ये त्याची कसर भरून निघणार आहे. २०१९ मध्ये सण, समारंभ आणि सहलीच्या नियोजनासाठी नोकरदारांना सुट्ट्यांची खूशखबर आहे. दुसरा आणि चौथा शनिवारसह रविवारधरून एकूण ९० पेक्षा आधीक सुट्ट्यांची पर्वणी मिळणार आहे. शनिवार आणि रविवारी सार्वजनिक सुट्ट्या रविवार आणि शनिवारी आल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना यावर्षीप्रमाणेच फटका बसला आहे. रविवार आणि दुसरा, चौथा शनिवारी आठ सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठ सुट्ट्या वाया गेल्या आहेत.

रविवारला जोडून सोमवारी चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना सर्व शनिवार-रविवार, किंवा किमान एक आड एक शनिवार सुट्टी असते, त्यांना शनिवार ते सोमवार असा लाँग वीकेंड प्लान करण्याची संधी चारवेळा मिळणार आहे.

दुसरा-चौथा शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या खालीलप्रमाणे आहेत…

जानेवारी (६ सुट्ट्या)
रविवार – ६, १३, २०, २७
शनिवार – ५, १२, १९, २६ ( प्रजासत्ताक दिवस)

फेब्रुवारी (७ सुट्ट्या)
रविवार – ३, १०, १७, २४
मंगळवार – १९ (शिवजयंती)
शनिवार – २, ९, १६, २३

मार्च (९ सुट्ट्या)
रविवार – ३, १०, १७, २४, ३१
सोमवार – ४ (महाशिवरात्री)
गुरूवार – २१ धुलिवंदन
शनिवार – २, ९, १६, २३, ३०

एप्रिल (९ सुट्ट्या)
रविवार – ७, १४ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), २१, २८
बुधवार – १७ (महावीर जयंती)
शुक्रवार – १९ (हनुमान जयंती, गुड फ्रायडे)
शनिवार – ६ (गुढीपाडवा), १३ (श्रीराम जयंती), २०, २७

मे (८ सुट्ट्या)
रविवार – ५, १२, १९, २६
बुधवार – १ (महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन)
शनिवार – ४, ११, १८ (बुद्ध पोर्णिमा), २५

जून (८ सुट्ट्या)
रविवार – २, ९, १६, २३, ३०
बुधवार – ५ (रमजान ईद)
शनिवार – १, ८, १५, २२, २९

जुलै (६ सुट्ट्या)
रविवार – ७, १४, २१, २८
शनिवार – ६, १३, २०, २७

ऑगस्ट (१० सुट्ट्या)
रविवार – ४, ११, १८, २५
सोमवार – १२ (बकरी ईद)
गुरूवार – १५ (स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन)
शुक्रवार – ३० ( महाराष्ट्रातील काही भागात पोळा या सणाला सुट्टी असते)
शनिवार – ३, १०, १७(पारशी नृतनवर्ष), २४(गोपाळकाला)

सप्टेंबर (१० सुट्ट्या)
रविवार – १(हरितालिका तृतीया), ८, १५, २२, २९(घटस्थापना)
सोमवार – २ (गणेश चतुर्थी)
गुरूवार – १२ (अनंत चतुर्दशी)
मंगळवार – १० (मोहराम)
शनिवार – ७, १४, २१, २८

ऑक्टोबर (१० सुट्ट्या)
रविवार – ६, १३(कोजागरी पोर्णिमा), २०, २७ (नरक चतुर्थी)
सोमवार – २८ (दिवाळी पाडवा)
मंगळवार – २९ (भाऊबीज)
मंगळवार – ८ (दसरा)
बुधवार – २(महात्मा गांधी जयंती)
शनिवार – ५, १२, १९, २६

नोव्हेंबर ( ७ सुट्ट्या)
रविवार – ३, १०, १७, २४
मंगळवार – १२ (गुरू नानक जयंती)
शनिवार – २, ९, १६, २३, ३०

डिसेंबर (८ सुट्टया)
रविवार – १, ८, १५, २२, २९
बुधवार – २५ ( ख्रिसमस)
शनिवार – ७, १४, २१, २८

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button