breaking-newsआंतरराष्टीय

१३०० कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीच्या पासवर्डसह सीईओचं निधन

कॅनडाच्या क्लवाड्रिगासीएक्स या क्रिप्टोकरन्सी कंपनीचा ३० वर्षीय सीईओ गेराल्ड कोटेन याचे भारतात निधन झाले आहे. कोटेनच्या मृत्यूसोबतच १३०० कोटी रुपये (१९० मिलिअन डॉलर) किंमतीच्या क्रिप्टोकरन्सीचा पासवर्डही त्याच्यासोबत गेला आहे. हा पासवर्ड केवळ त्यालाच माहिती होता. टॉप सिक्युरिटी एक्सपर्टही हा पासवर्ड अनलॉक करण्यास असमर्थ ठरले आहेत. यामुळे आता लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. कोटेनच्या पत्नीलाही हा पासवर्ड माहिती नाही.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत आतड्यांच्या आजाराने कोटेन मृत्यू झाला असून त्यावेळी तो भारताच्या दौऱ्यावर होता. इथे अनाथ मुलांसाठी एक अनाथालय सुरु करण्याचा त्याचा विचार होता. कंपनीच्या सोशल मीडिया पेजवर याची माहिती देण्यात आली आहे. जेव्हा कोटेनची पत्नी जेनिफर रॉबर्टसन आणि कंपनीने कोर्टात क्रेडिट अपील दाखल केले. त्यावेळी कोटेनच्या मृत्यूची माहिती समोर आली.

कोर्टात दाखल केलेल्या अर्जामद्ये जेनिफरने म्हटले की, तिला कोटेनच्या इनक्रिप्टेड अकाऊंटला अनलॉक करत येत नाहीए यामध्ये त्यांची संपत्ती आहे. १३०० कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी देखील यामध्ये बंद आहे. कोटेन ज्या लॅपटॉपवरुन काम करीत होता, तो इन्क्रिप्टेड आहे. याचा पासवर्ड त्याच्या पत्नीलाही माहिती नाही. ३१ जानेवारी रोजी त्याच्या पत्नीने आणि कंपनीने वेबसाईटच्या माध्यमांतून नोवा स्कोटियाच्या सुप्रीम कोर्टात हा अर्ज दाखल केला होता. कंपनीने म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यापासून आम्ही या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. क्रिप्टोकरन्सीचे अकाऊंट शोधण्याचा आणि ते सुरक्षित करण्याचा आम्ही हरऐक प्रयत्न केला आहे. आम्हाला आमच्या ग्राहकांना त्यांचे पैसे परत करायचे आहेत. मात्र, आम्हाला ते मिळू शकत नाहीए. कारण आम्ही अद्याप या अकाऊंटपर्यंतच पोहोचूच शकलेलो नाही.

सोशल मीडियावर मात्र, यावरुन विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. कारण, गेराल्डला जर आतड्यांचा आजार होता तर तो भारतात का आला होता. कारण, भारतात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे, असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button