breaking-newsपुणे

होर्डिंगप्रकरणी रेल्वे प्रशासनाचीच चूक

पुणे  ( महा ई न्यूज ) – पुण्यातील होर्डिंगचा सांगाडा उतरविताना आवश्‍यक उपाययोजना व काळजी घेण्यात आली नाही, परिणामी होर्डिंग कोसळून चार जणांना आपला जीव गमवावा लागला. हा अपघात रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळेच घडला असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. दरम्यान, या प्रकरणात दोषी असलेल्या मात्र पळून गेलेल्या आरोपींना दोन दिवसांत अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

शाहीर अमर शेख चौकातील रेल्वेच्या हद्दीत असलेल्या होर्डिंगचा सांगाडा उतरविताना शुक्रवारी दुपारी सांगाडा कोसळून झालेल्या अपघातात रिक्षाचालकांचा मृत्यू झाला; तर अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी शनिवारी रेल्वेचा कनिष्ठ अभियंता संजयसिंह विष्णूदेवसिंह व लोहार ग्रेड दोन पांडुरंग निवृत्ती वनारे या दोघांना अटक केली होती. ठेकेदार व कामगार मात्र घटनेनंतर पळून गेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button