breaking-newsआंतरराष्टीय

होंडुरसमध्ये विमानाचे दोन तुकडे झाले, तरीही सर्व प्रवासी वाचले

टोन्कोण्टिन (होडुरस) – एका खासगी जेट विमानाचे विमानतळावर उतरताना दोन तुकडे झाले, पण तरीही त्यातील सर्व प्रवासी सुखरूप वाचल्याची आश्‍चर्यकारक घटना हॉडुरसची राजधानी तेगुसिगल्पामधील टान्क्कोटिन आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली आहे. मंगळवारी सकाळी 11.15 च्या दरम्यान गल्फस्ट्रीमचे जी 200 हे जेट विमान विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि एका खड्ड्यात कोसळले. खड्ड्यात पडल्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले. टेक्‍सासहून आलेल्या या विमानाची नोंदणी उटाह येथे झालेली आहे.

कोसळल्यानंतर विमानाने पेट घेतला, पण अग्निशमन दलाने आग त्वरित नियंत्रात आणली. आणि आतील प्रवाशांना वाचवल्याची माहिती पेद्रो अटाला या स्थानिक व्यावसायिकाने दिली आहे. विमानात पाच पुरुष आणि एक महिला असे सहा प्रवासी होते.

अपघातानांतर विमानतळ काही काळ बंद ठेवण्यात आला होता. विमान कोसळताना विजेच्या तारा तुटल्याने आजूबाजूच्या सुमारे 50 हजार नागरिकांना अंधारात राहावे लागले आहे.

सभोवताली डोंगराळ भाग असलेला हा विमानतळ विमानांना उतरण्यासाठी एक कठीण विमानतळ समजला जातो. येथून 50 किमी आंतरावर नवीन विमानतळाचे काम चालू आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button