Uncategorized

होंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक!

नवी दिल्ली। होंडाने आपली बजेट बाइक ‘ड्रीम डीएक्स’, बीएस-४ मध्ये सुधारणा करून ‘CD 110 Dream DX’ या नावाने बाजारात आणली आहे. या बाइकची एक्स शोरूम किंमत असेल ४५,००२ रूपये ( किक-स्टार्ट व्हॅरिअंट). सेल्फ स्टार्ट व्हॅरिअंटसाठी मात्र थोडेस जास्त म्हणजेच ४७,२०२ रुपये मोजावे लागणार आहेत.
कंपनीच्या या सर्वात स्वस्त बाइकमध्ये बीएस-४ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेसोबतच ऑटो हेडप्लँप्स आणि ऑन फीचर देखील देण्यात आले आहेत.
नव्या ‘होंडा सीडी ११० ड्रीम डीएक्स बाइक’मध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि ट्विन हायड्रॉलिक शॉक्स देण्यात आले आहेत. यासोबतच मेंटेनन्स फ्री बॅटरी, इलेक्ट्रिक स्टार्ट, ट्यूबलेस टायर्ससारख्या इतर सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button