breaking-newsक्रिडा

हे सुवर्णपदक माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे – दीपा कर्माकर

नवी दिल्ली: भारताची आघाडीची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने रविवारी तुर्कीत झालेल्या विश्वचषक जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी दीपावर अभिनंदनाचा वर्षाव केला. दीपानेही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानताना हे सुवर्णपदक आपल्यावर सतत विश्वास ठेवणाऱ्यांचेच असल्याचे म्हटले आहे.

दीपाने अंतिम फेरीत 14.150 गुणांची कमाई करताना सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. दीपाने त्याआधी पात्रता फेरीत 13.400 गुणांची कमाई केली होती. अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करताना सोनेरी यश मिळवून दीपाने भारताला आगामी आशियाई क्रीडास्पर्धेपूर्वी आणखी एका पदकाचे स्वप्न दाखविले आहे. या कामगिरीनंतर मायदेशात सर्वच स्तरातून दीपाचे कौतुक करण्यात आले.

इंडोनेशियात येत्या 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेसाठी भारतीय जिम्नॅस्टिक्‍स संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या संघात दीपाचा समावेश करण्यात आला असल्यामुळे दीपाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपाचे कांस्यपदक थोडक्‍यात हुकले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button