breaking-newsताज्या घडामोडीपुणे

हेल्मेट सक्तीच्या विरोेधात कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

पुणे –  हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीने हेल्मेटला कधीच विरोध केला नाही. पण पोलिसांकडून सक्तीचे भुत पुणेकरांच्या लादले जात आहे. नवीन अधिकारी आले की हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतात. हा निर्णय केवळ प्रसिध्दीसाठी घेतला जातो. सर्वसामान्यांचे मत जाणून घेतले जात नाही. त्यामुळे आता पहिल्यांदा पोलिसांना सक्तीविरोधात निवेदन दिले जाईल. त्यानंतरही सक्ती कायम ठेवल्यास रास्ता रोको, निदर्शने, सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने मंगळवारी दिला.

पुणे पोलिसांकडून येत्या १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरूवात शहरात मंगळवारपासून करण्यात आली. हेल्मेट न घातलेल्या दुचाकीवरील सरकारी कर्मचाºयांवर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरूवात केली. यापार्श्वभूमीवर हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीची बैठक आनंदऋषी ब्लड बँकेच्या आवारात झाली. या बैठकीला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर शांंतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, भाजपाचे संदीप खर्डेकर, काँग्रेसचे संजय बालगुडे, शिवसेनेचे शाम देशपांडे, मनसेच्या रुपाली पाटील, रिपब्लिकन पक्षाचे मंदार जोशी, धनंजय जाधव, विश्वास चव्हाण, बाळासाहेब रुणवाल, गिरीश भिलारे, प्रफुल्ल देशमुख आदींनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button