breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्याविरोधात प्रश्न उपस्थित करा

–  पिंपरीतील अपना वतन संघटनेची तिन्ही आमदारांकडे मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील तरुण व्यसनाच्या आहारी जावू लागले आहेत. गांजा, चरस, अफू, हिरोईन, मटका, जुगार, दारु अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. हे धंदे रोखण्याचे काम पोलिस प्रशासनाचे असतानाही भ्रष्ट अधिका-यामुळे अवैध व्यवसाय जोमाने सुरु आहेत. त्यामुळे अवैध धंद्याविरोधात हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी अपना वतन संघटनेचे सिध्दीक शेख यांनी केली आहे. 

याबाबत पिंपरीचे आमदार गाैतम चाबुकस्वार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी निवेदन दिले आहे. तसेच पोलीस आयुक्त आर.के. पद्नाभन यांना अवैध बंद करण्याची मागणीही केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात १५ ऑगस्टला पोलीस आयुक्तालयाचे उदघाटन झाले.  त्यानंतर शहरातील गुन्हेगारी कमी होईल, अवैध धंदयांना लगाम बसेल,  असे नागरिकांना वाटले होते. मात्र,  गुन्ह्यांची आकडेवारी वाढतच चालली आहे. बंदूक ,काडतुसे ,गावठी पिस्टल यांसारखी शस्त्रे आढळून येत आहेत. निगडी, भोसरी ,चिंचवड, पिंपरी, वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गाड्यांची तोडफोड,  दहशत माजवणे, शस्त्रे घेऊन फिरणे असे अनेक प्रकार सर्रासपणे घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनाही वाढल्या आहेत.

शहरात अनेक टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. मटका ,जुगार ,अवैध दारू विक्री ,वेश्याव्यवसाय यांसारखे अवैध व्यवसाय पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादाने चालू आहेत. तसेच चरस ,गांजा ,हेरॉईन यांसारखे ड्रग्स खुलेआमपणे बेकायदेशीररीत्या विक्री चालू आहे. शहरात कामगार, व्यावसायिक ,शिक्षक ,मुले ,महिला ,ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नाहीत.  अवैध धंदेवाल्यानी तर टोळ्याच तयार केल्या आहेत. या अवैध धंद्यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा काळा पैसा गोळा केला जात आहे.

तसेच शहरातील तरुण पिढी या अवैध धंद्यांच्या व अमली पदार्थांच्या व्यसनामुळे उध्वस्त होत आहे. एवढा गंभीर प्रश्न पिंपरी चिंचवड शहरामध्ये असताना याविषयी एकही आमदार बोलत नाही. सध्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अपना वतन संघटना शहरातील वाढत्या गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात उपोषण केले आहे. यामध्ये शहरातील ५० संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे शहरातील नागरीकांचे प्रतिनिधीत्व करणा-या तिन्ही आमदारांनी या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारी व अवैध धंद्यांचा प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी अपन वतन संघटनेने नागरिकांच्या वतीने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button