breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संगणक अभियंता महिलेचा कॅबमध्ये विनयभंग, चालक अटकेत

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – हिंजवडी येथे उबर कॅब चालकाने संगणक अभियंता महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅब चालकाने महिलेला कॅबमध्ये लॉक करून ताटकळत बसविले आणि आरशात पाहून अश्लिल हावभाव केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तुषार बबनराव लांडगे या चालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय महिला बाणेर येथे वास्तव्यास आहे. त्या हिंजवडीमधील नामांकित कंपनीत संगणक अभियंता आहेत. शुक्रवारी (दि. 18) दुपारी साडेबाराच्या सुमारास चालक तुषार लांडगे त्यांना घेण्यासाठी गेला. प्रवासादरम्यान महिलेने कारमध्ये जेवणाचा डबा उघडला आणि त्या खात बसल्या. तुषारने त्या महिलेला कारमध्ये डबा खाण्यापासून रोखले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक भांडण झाले.

तुषारने आरशातून वाईट नजरेने पाहिले. तसेच, अश्लिल इशारेही केले, असे महिलेचे म्हणणे आहे. हिंजवडी वाकड पुलाखाली गाडी आल्यानंतर तुषारने त्या महिलेला कारमधून उतरु दिले नाही. त्याने कार लॉक केली आणि आता तुझी काय अवस्था करतो बघ, अशी धमकी देखील दिली, असा आरोप त्या महिलेने केला आहे. शेवटी कारमधून बाहेर पडल्यावर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि तुषारविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तुषारला अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button