breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…हा तर राष्ट्रवादीच्या दत्ता सानेंचा बालिशपणा

  • शिवसेना शहराध्यक्ष योगेश बाबर यांची टिका
  • पालिकेतील विरोधी पक्षनेता नसून खरेदी नेता

पिंपरी (महा-ई-न्यूज) – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे डिपॉजीट जप्त करण्याची भाषा करणारे विरोधी पक्षनेते दत्ता सानेंनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी जाणून घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राहुल नार्वेकर यांचे डिपॉजीट बारणेंनी जप्त केले होते. जे आपल्या उमेदवाराचे डिपॉजीट वाचवू शकत नाहीत, ते दुस-याचे डिपॉजीट जप्त करण्याची भाषा करत आहेत. सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामावर आवाज न उठवणारे साने पालिकेतील विरोधी पक्षनेता नव्हे, तर सत्ताधारी पक्षाचा खरेदी नेता आहेत, अशी टिका शिवसेनेचे शहराध्यक्ष योगेश बाबर यांनी केली आहे.

यासंदर्भात बाबर यांनी प्रसिध्दी पत्रक काढून जोरदार टिका केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून  आगामी लोकसभा निवडणूक पार्थ पवार लढविणार असल्याची चर्चा आहे. खासदार श्रीरंग बारणे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, कोण पार्थ पवार, पार्थ पवारची ओळख अजितदादांचे पूत्र एवढीच आहे. त्यांचे सामाजिक कार्य काय आहे. त्यांना स्वत: ची ओळख करून देण्यासाठी पोस्टरबाजी करावी लागते. त्याला प्रत्युत्तर देताना साने यांनी खासदार बारणे हे राष्ट्रवादी काँग्रेसमुळे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. आगामी निवडणुकीत बारणे यांचे ‘डिपॉजीट’ लोकसभेत राहणार नाही, असे वक्तव्य केले होते.

दत्ता साने यांचे वक्तव्य बालीशपणाचे आहे. त्यांची राजकीय अपरिपक्वता त्यांच्या  पत्रकबाजीतून दिसून येते. खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वत: याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. पत्रकारांनी विचाल्यानंतर आपले मत मांडले होते. बारणे गेली पंचवीस वर्षे या शहरामध्ये राजकीय व सामाजिक काम करत आले आहेत. नगरसेवक ते खासदार अशी त्यांची ओळख आहे. महापालिकेच्या पाच निवडणुका, विधानसभा, लोकसभा आशा निवडणुका लढवलेले बारणे लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडणारा खासदार म्हणून ओळखले जातात. दत्ता साने यांना खासदार आप्पा बारणे यांची व शहराची राजकीय पार्श्वभूमी माहित नाही. ते त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. स्थायीचे अध्यक्षपद  हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  उमेदवार असलेले शाम वाल्हेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून मिळवले होते. ते अजित पवार यांच्या कृपेने मिळाले नव्हते. याचे साने यांनी आकलन करून घ्यावे. 42 दिवस चाललेल्या या निवडणुकांचा इतिहास पिंपरी-चिंचवड शहरवाशियांना माहिती आहे, असेही बाबर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button