breaking-newsआंतरराष्टीय

स्वीत्झर्लंडमध्ये विमान अपघातात 20 ठार

जिनिव्हा: दुसऱ्या महायुद्धातील एक विमान स्वीत्झर्लंडच्या डोंगररांगांमध्ये कोसळून 20 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. “द जंकर जेयु 52 एचबी हॉट’ हे विमान जर्मनीमध्ये 1939 साली बांधण्यात आले होते. सध्या हे विमान स्वीस हवाई दलाशी संबंधित जेयु-एअर कंपनीच्या मालकीचे होते. स्वीत्झर्लंडच्या पूर्वेकडील सेग्नास पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 2,500 मीटर उंचीवर असताना ते काल कोसळले. त्यामध्ये 17 प्रवासी आणि 3 कर्मचारी होते. हे सर्वच्या सर्व म्हणजे 20 जण या अपघातात मरण पावल्याची भीती व्यक्‍त होत आहे. एखाद्या दगडाप्रमाणे हे विमान सरळ खाली कोसळले. विमान कोसळण्याचे प्रमुख कारण त्याचा स्फोट होणे हे नव्हते. असे एका प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितले. या अपघातानंतर जेयु एअर विमान कंपनीची सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button