breaking-newsराष्ट्रिय

स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

रांची: झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात स्वामी अग्निवेश यांना भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वामी अग्निवेश यांच्या दौऱ्याचा निषेध सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी कार्यकर्त्यांनी “अग्निवेश गो बॅक’ अशा घोषणा दिल्या. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री रघुबरदास यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पाकूर येथे एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अग्निवेश येथे आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते हॉटेलमधून बाहेर पडतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बीफ खाण्याच्या समर्थनार्थ स्वामी अग्निवेश यांनी नुकतेच एक विधान केले होते त्यावरुन चिडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला काळे झेंडे दाखवून अग्निवेश यांचा निषेध केला. मात्र काही वेळातच कार्यकर्त्यांनी अग्निवेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी अग्निवेश यांना धक्काबुक्की करुन जमिनीवर पाडलं. यानंतर त्यांचे कपडे फाडले आणि पगडीदेखील काढली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button