breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, पुण्यात दुधाच्या पाच गाड्या कार्यकर्त्यांनी फोडल्या

पुणे – राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत रविवारी ( 15 जुलै ) रात्री १२ वाजेपासून दुधाचे आंदोलन सुरू केले. राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button