breaking-newsआरोग्यमहाराष्ट्र

स्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी

पुणे- शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या दिवसाठी दोन ते अडीच हजार रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी केली जात आहे. प्रत्यक्षात स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या जरी कमी असली तरीही अनेकांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येत आहेत. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 4 हजार 574 रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत तर पावणे पाच लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
यावर्षी शहरात 13 स्वाइन फ्लू चे रुग्ण आढळले आहेत. या सगळ्यांवर यशस्वीरित्या उपचारही झाले आहेत. मात्र नागरिकांमधील स्वाइन फ्लूची लक्षणे व त्यामुळे पसरलेले भितीचे वातावरण सध्या शहरात पहायला मिळत आहे. सध्या एकही रुग्ण सरकारी किंवा खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूबाबत उपचार घेत नाही. पण दररोज दवाखान्यांतून होणा-या तपासण्यांमध्ये दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी होत आहे. त्यापैकी दररोज सरासरी 25 रुग्णांना टॅमी फ्लू देण्यात येत आहे. तर दोन ते तीन जणांचे घशाचे द्रव हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. अशा प्रकारे गेल्या आठ महिन्यात 638 जणांचे घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 13 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button