breaking-newsपुणे

स्वाइन फ्लू वाढल्याने लशी मागविणार’

पुणे – स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधक लशी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या लशी उपलब्ध नसून केवळ स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांनाच टॅमी फ्लू या गोळ्या दिल्या जात आहेत. नागरिकांनी योग्य प्रकारे दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मागील महिनाभरात स्वाइन फ्लूची लागण झाल्याने ३ महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच, संशयित रुग्णांचा आकडाही दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या शहरात स्वाइन फ्लूचे ३८ रुग्ण असून जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल ५ लाख ६५ हजार ६३९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी ५ हजार ४१० संशयित रुग्णांना टॅमी फ्लू या गोळ्या सुरू करण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लू झालेल्या १४ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांपैकी १० जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, आतापर्यंत २१ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या रुग्णांना लगेच टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या जात आहेत. गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना स्वाइन फ्लूची लागण होऊ नये म्हणून लशी दिल्या जातात; परंतु सध्या त्या लशींचा साठा उपलब्ध नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button