breaking-newsपिंपरी / चिंचवड

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक बांधण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा – जयंत शिंदे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राजकारणाच्या पलीकडे जावुन सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा लोकनेता आज आपल्यात नाही व त्यांची उणीव सदैव आपल्याला भासत राहील, लोकनेते मुंडे यांनी प्रत्येक वर्गावर भरभरून प्रेम केलं, अशा शब्दांत कामगार नेसेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी अदरांजली वाहिली.

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिम्मित बांधकाम कामगार सेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे, उपाध्यक्ष किशोर हातागळे, सरचिटणीस सचिन गुंजाळ, नोसी खान आदी प्रमुखांसह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, लोकनेते मुंडे यांनी प्रत्येक वर्गावर भरभरून प्रेम केलं, बांधकाम कामगार, शेत मजुर व इतर असंघटित क्षेत्रातील कामगार आजही त्यांना दैवत मानतात, त्यांच्या जाण्याने मराठवाड्याचे खुप नुकसान झाले आहे शहरात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी आम्ही सेनेच्या वतीने पाठपुरावा करत आहोत” असे ते म्हणाले.

बांधकाम कामगारांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, लोकनेते मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधुन १७० बांधकाम कामगारांना शासकीय नोंदणीकृत ओळखपत्राचे वाटप करून सर्व कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button