breaking-newsक्रिडा

‘स्वप्ना’वत कामगिरी, भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक

जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या स्वप्ना बर्मनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये स्वप्ना बर्मनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताचे दिवसभारतील दुसरे तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील ११ वे सुवर्णपदक आहे.

पात्रता फेरीमधील पहिल्या दोन (भालाफेक आणि उडी) निकषांमध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने ८०० मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. हेप्टॉथ्लॉन या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर 100 मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.  हेप्टॉथ्लॉनमध्ये स्वप्ना बर्मनने ६०२६ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Team India

@ioaindia

at the
A true Champion will fight through anything! After a long course of competing in 7 different events in Women’s Heptathlon at the , finished 1st with 6026 points! champ @Swapna_Barman96

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button