breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्मार्ट सिटीअंतर्गत संपूर्ण  शहर इंटरनेटद्वारे जोडले जाणार

  • आयुक्त श्रावण हार्डीकर यांची माहिती
  • फायबर ऑप्टीक नेटवर्क आणि अॅक्टीव्ह पायाभूत सुविधांवर भर

पिंपरी – स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सायबर बॅकबोन आणि स्मार्ट इलीमेंट अशा दोन टप्प्यात कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी 650 कोटींच्या दोन वेगवेगळ्या निविदा राबविण्यात आल्या आहेत. फायबर ऑप्टीक नेटवर्क आणि अॅक्टीव्ह पायाभूत सुविधा देण्यासाठीची यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. भविष्यात संपूर्ण शहर इंटरनेटद्वारे जोडले जाणार आहे. येत्या दीड वर्षाच्या कार्यकाळात कामे पूर्ण होतील, अशी माहिती आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी दिली.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीअंतर्गत पायाभूत विकास कामे करण्यासाठी पिंपळे सौदागरची निवड करण्यात आली आहे. जसजसे काम पूर्ण होईल, तसे केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होईल. त्यामुळे कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करत जाणार आहोत. त्यासाठी दोन वेगवेगळ्या निवदा काढल्या आहेत. पहिल्या निविदेमध्ये शहरासाठी सायबर बॅकबोन तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे भविष्यात प्रत्येक घराला इंटरनेटद्वारे जोडले जाणार आहे. त्यासाठी फायबर ऑप्टीक नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता सार्वजनिक सुविधेचा उपयोग करून पोल उभे केले जातील. त्यावर आवश्यक उपकरणे बसविण्यात येतील. वायफाय, किऑस्क, मी कार्ड कीऑस्क, एलईडी माहिती फलक आदींसाठी पोल उपयुक्त ठरणार आहेत. सुमारे 750 कि.मी. फायबर ऑप्टीक केबल टाकण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त हार्डीकर यांनी दिली.

स्मार्ट इलीमेंटची दुसरी निविदा आहे. या निविदेनुसार अक्टीव्ह पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे. स्मार्ट पार्किंग, स्मार्ट वाहतूक सेवा, स्मार्ट पाणी पुरवठा, सिटी सुरक्षा, गुन्हेगारी कृत्याचा छडा लावण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी शहरात 105 ठिकाणी जंक्शन तयार करण्यात येणार आहेत. त्याकरिता सूचना मागविण्यात आल्या होत्या. काहींच्या सूचनाही आल्या आहेत. त्यानुसार त्यामध्ये बदल करण्यात येणार आहेत. विशेषतः रुफ टॉल सोलर पॅनल तयार करून त्याचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे, असे आयुक्त हार्डीकर यांनी सांगितले.

डीपीचे काम युध्दापातळीवर

स्मार्ट सिटीअंतर्गत प्रदुषण विरहीत सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. नॉन व्हेईकल झोन तयार केला जाणार आहे. त्यासाठी जागेची पाहणी करण्यात येणार आहे. तत्पुर्वी सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली जाणार आहे. एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये येणा-या कामासाठी डीपी तयार करण्याचे काम सुरू आहे. कॉमन युटीलिटी तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे भविष्यात खासगी कंपन्यांच्या सेवावाहिनी टाकण्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे, असेही आयुक्त हार्डीकर म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button