breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्मार्ट बायका कुठे जातात’ या आक्षेपार्ह फलकावरुन दुकान मालकांचा जाहीर माफीनामा

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  ‘स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा १५ ऑक्टोबर’, असा मजकूर लिहिलेले आक्षेपार्ह फलक गुरुवारी आकुर्डी ते साने चाैकापर्यंत झळकले होते. त्या आक्षेपार्ह फलकामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. याबाबत महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रीया येवू लागल्याने संबंधित दुकान मालकांनी जाहिरातीत महिलांचा अवमान करण्याचा आमचा हेतू नव्हता, त्या जाहिरातीमुळे कुणाची मने दुखावली असल्यास आपली जाहीर माफी मागते, असे संबंधित दुकान मालकांनी प्रसिध्दपत्रकांद्वारे जाहिर केले आहे.  

काही दिवसांपूर्वी पिंपळेसौदागर परिसरात शिवडे’, ‘आय एम सॉरी’ असे फलक झळकले होते. प्रियकराने प्रियेशीची माफी मागण्यासाठी हे फलक लावण्याचे तपासात समोर आले होते. फलक लावणारा प्रियकर राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने हे प्रकरण दडपण्यात आले.

त्यानंतर गुरुवारी आकुर्डीतील खंडोबा चौक ते साने चौक या दरम्यान पथदिव्यांवर आक्षेपार्ह फलक झळकले होते. ‘स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा १५ ऑक्टोबर’, असे मजकूर फलकांवर लिहिला होता. त्यावर महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमल्या होत्या. याबाबत एका साडी सेंटरच्या दुकान मालकांनी हे फलक लावल्याचे जाहीर झाले. त्या दुकानाचे सुरु करण्यात येणार होते. त्यामुळे सदरील जाहिरातीतून महिला भगिनींची दिलगिरी व्यक्त जाहीर माफी मागितली आहे. असे शारदा साळुंखे आणि सुनिता आैटी यांनी प्रसिध्द पत्रक काढले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button