breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायीच्या मागील तीन महिन्यांतील वाढीव दरांच्या निविदांची चाैकशी करा

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर वाढीव दराने निविदा काढण्याचा सपाटा लावला आहे. त्या-त्या निविदा प्रक्रियेला आम्ही विरोध दर्शवून आक्षेप नोंदविला आहे. तसेच शिवसेना, मनसे आणि सामाजिक संघटनांनी वाढीव दरांच्या निविदा रद्द करण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागाकडून काढण्यात आलेल्या वाढीव दराच्या निविदा रद्द करुन फेरनिविदा काढण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. 

यासंर्दभात महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या स्थापत्य विभागाने रस्त्याच्या विविध निविदा प्रसिध्द केल्या. त्यातील काही निविदा प्रक्रियेत ठेकेदार आणि अधिका-यांनी रिंग केल्याचे उघड झाले. याबाबत  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नगरसदस्य मयुर कलाटे व भाजपचे नगरसदस्य तुषार कामटे यांनी रस्त्यांच्या कामांच्या निविदांमध्ये रिंग झाल्याचे उघडकीस आणले. यावरुन भाजप सत्तेवर आल्यानंतर निविदांमध्ये वाढीव दराच्या रिंग होत असल्याचे सिध्द होत आहे.

दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समितीकडून मागील तीन महिन्यात मंजुरी देण्यात आलेल्या सर्व निविदांच्या पुढील प्रक्रीयेस स्थगिती द्यावी, प्रत्येक कामांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्या निविदा प्रक्रियेतील दोषीवर कारवाई करुन सर्व कामांची फेरनिविदा काढण्यात याव्यात.अशीही मागणी त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button