breaking-newsक्रिडा

स्टार क्रिकेट ट्रॉफी 2018: पूना क्रिकेट क्‍लबचा 4 गडी राखून विजय

पुणे- मुकुंद गायकवाड आणि दर्शित लुंकडच्या भेदक गोलंदाजीनंतर ओमकार मोहोळच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर पूना क्‍लबने स्टार्स क्रिकेट ऍकॅडमीचा 4 गडी आणि 18 चेंडू राखून पराभव करताना येथे सुरु असलेल्या स्टार क्रिकेट ट्रॉफी 2018 मध्ये विजयी आगेकूच नोंदवली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना स्टार्स संघाला 35.1 षटकांत सर्वबाद 173 धावांचीच मजल मारता आली. त्यामुळे पूना क्‍लब समोर विजयासाठी 174 धावांचे आव्हान त्यांना ठेवता आले. प्रत्युत्तरात फलंदाजी करणाऱ्या पूना क्‍लबने हे आव्हान 42 षटकांत 6 बाद 174 धावा करत पुर्ण करत सामन्यात्‌ विजयी आगेकूच नोंदवली.
174 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पूना क्‍लबच्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर राघवेंद्र ओझा केवळ 16 धावा करुन परतला तर दुसरा सलामीवीर सुर्यकांत सरोजदेखिल केवळ 17 धावाच करु शकला. त्यामुळे सुरुवातीलाच दोन धक्‍के बसल्यानंतर पूना क्‍लबच्या मधल्याफळीतील फलंदाज ओमकार मोहोळ आणि दर्शित लुंकडयांनी संघाचा डाव सावरताना संघाला शतकी वेस ओलांडून दिली. यावेळी ओमकार मोहोळने 102 चेंडूंचा सामना करताना 65 धावांची खेळी केली तर दर्शित लुंकडने 45 चेंडूत 34 धावा करत त्याला सुरेख साथ दिली. पूना क्‍लबचा संघ विजयाच्या समीप आल्यानंतर हे दोघेही बाअद झाली. तर, त्यानंतर आलेला सचित धस देखिल केवळ 1 धाव काढून परतल्याने पूना क्‍लबचा संघ अडचणीत आला होता. मात्र, त्यानंतर सागर मालेपट्टी आणि चंद्रकांत सरोजयांनी संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केला.

यावेळी स्टार्स क्रिकेट ऍकेडमीच्या सूरज जाधवने 28 धावा देत 2 गडी बाद केले. तर, हार्दिक अडकने 41 धावांमध्ये 2 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्टार्सच्या संघाची सुरुवात खराब झाली त्यांचा सलामीवीर अजिंक्‍य गायकवाड केवळ 13 धावा करुन परतला तर, दुसरा सलामीवीर देवगुंडे देखिल केवळ 7 धावा करुन परतला. तर, त्यानंतर आलेल्या जयराज दिवान (2), हार्दिकर (6), आदित्य मगर (10) आणि सूरज जाधवयांना विशेष चमक दाखविता न आल्याने त्यांचा संघ चांगलाच्व अडचणीत आला होता. त्यावेळी तळातील फलंदाज अभिषेक बोधे आणि सोहम लेले यांनी संघाचा डाव सावरताना स्तार्सला शंभरी गाठून दिली. यावेळी बोधेने 40 धावांची खेळी केली. तर, सोहमने 23 धावा करत त्याला सुरेख साथ दिले. हे दोघेही बाद झाल्यानंतर नचिकेत वेर्लेकरने नाबाद 27 धावांची खेळी करत स्टार्सच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button