breaking-newsराष्ट्रिय

स्टरलाईट विरोधातील आंदोलन चिघळले

  • तुतिकोरिनमध्ये जमावबंदी लागून : आणखी एका तरूणाचा मृत्यू 

तुतिकोरनि (तामिळनाडू) – येथील वेदान्ताच्या स्टरलाईट कॉपर उद्योगाविरोधात सुरू असलेले आंदोलन चिघळले आहे. या भागात बुधवारी झालेल्या गोळीबारात आणखी एका 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला असून शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या गोळीबारात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्रालयाने मंगळवारी झालेल्या गोळीबारासंदर्भात तामिळनाडू सरकारकडून अहवाल मागितला आहे.

गेले महिनाभर तुतिकोरिन येथे वेदांतच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागले. या भागात बुधवारी कडेकोट बंदोबस्त होता. मद्रास उच्च न्यायालयानेही प्रकल्पाच्या विस्तारास स्थगिती दिली. पण स्थानिकांमधील असंतोष कमी झाल्याचे दिसत नाही.

बुधवारी दुपारी पुन्हा एकदा आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला असून यात एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. या आंदोलनाचे लोन दुसऱ्या शहरातही पसरत असून चैन्नई येथेही वेदान्ताच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले.

या गोळीबारावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेने 11 लोकांच्या मृत्यूचा निषेध करत 25 मार्च रोजी सर्वपक्षीय सामुहिक प्रदर्शन करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय एमडीएमकेचे अध्यक्ष वायको यांनी आंदोलनातील जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

रजनीकांत याने ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ जारी केला आहे. यात तामिळ नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभिनेता कमल हासनने देखील तुतिकोरनि येथे जाऊन जखमी झालेल्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. याप्रसंगी त्यांना नागरिकांच्या रोषाला आणि विरोधाला सामोरे जावे लागले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button