breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोशल मिडिया हाताळण्यासाठी मनसे पंधरा पदाधिकारी नेमणार

शहराध्यक्ष सचिन चिखले यांची माहिती

पिंपरी – आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर मनसे देखील सोशल मिडियावर अधिक भर देणार आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात पाच पदाधिकारी नेमले जाणार आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण पंधरा पदाधिकारी नेमले जाणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा मतदार संघासह महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांकडून सोशल मिडियाचा प्रचारासाठी प्रभावी वापर झाला. मात्र, मनसे यामध्ये मागे पडली होती. आगामी निवडणुका लढताना आपण यामध्ये मागे राहायला नको, यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी पक्षाचे फेसबुक पेज सुरू केले. त्यातच नुकतेच त्यांनी ट्वीटरचे देखील अकाऊंट काढले आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन शहराध्यक्ष चिखले यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची ध्येयधोरणे, आचार-विचार, लोकांसाठी केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मिडिया उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेची नुकतीच शहर कार्यकारिणी जाहिर झाली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेत पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मतदार संघनिहाय पदाधिका-यांची घोषणा केली जाणार आहे. त्यात सोशल मिडिया हाताळण्यासाठी देखील स्वतंत्र पदाधिकारी नेमले जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात पाच पदाधिकारी सोशल मिडाया हातळण्याचे कामकाज पाहणार आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीन मतदार संघात एकूण पंधरा पदाधिका-यांच्या नियंत्रणाखाली सोशल मिडियाच्या माध्यमातून पक्षाचे आचार-विचार लोकांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत.  विद्यार्थी शहराध्यक्ष हेमंत डांगे, चिंचवड विधानसभा विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे, शहर सचिव रुपेश पटेकर यांच्यावर जबाबदारी राहणार आहे, असे चिखले यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button