breaking-newsराष्ट्रिय

सेक्‍स कॅंडलप्रकरणी बीएसएफच्या माजी डीआयजीसह पाच जणांना तुरुंगवास

चंदीगढ – जम्मू-काश्‍मीरमधील सेक्‍स कॅंडलप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बीएसएफच्या माजी डीआयजी आणि तत्कालीन डीएसपीसह पाच जणांना प्रत्येकी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायाधिश गगन गित कौर यांनी ही शिक्षा ठोठाविली.

या प्रकरणात 30 मे रोजी न्यायालयाने बीएसएफचे माजी डीआयजी के. सी. पांधी, तत्कालिन डीएसपी मोहम्मद अशरफ मीर, मसूद अहमद उर्फ मकसूद यांच्यासह 5 जणांना दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांकडून कमी शिक्षा सुनावली जावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. पांधी हे देशासाठी दहशतवाद्यांसोबत लढले, त्यांनी जवळपास 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे त्यांना कमी शिक्षा सुनावली जावी, असा युक्तीवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता.

दुसरीकडे, कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्या अधिकारांचा त्यांनी गैरवापर केला, असे सरकारी वकील म्हणाले. पांधी आणि मीर यांनी पीडितेला सुरक्षा पुरवायला हवी होती. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यानंतर न्यायालयाने 6 जून रोजी शिक्षा सुनावण्याचा निर्णय घेतला होता.

या सेक्‍स स्कॅंडलची एक सिडी मार्च 2006 मध्ये पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. या व्हिडीओत काही पोलीस अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button